सांगली व सातारा जिल्याच्या सरहद्दीवर शिरसगाव हे सोनहिऱ्याच्या कुशीत वसलेले व निसर्गाचे वरदान लाभलेले डोंगराळ व दुर्गम भागामध्ये वसलेले गावं आहे.१९ व्या शतकामध्ये शिरसगाव हे औध संस्थान अंतर्गत येते होते.स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाले नंतर शिरसगाव हे दक्षिण सातारा जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले.

                   क्षेत्रफळ व प्रशासनाचे दृष्टीने काम करणे सोपे जानेसाठी दक्षिण सातारचे विभाजन करून सांगली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.सांगली जिल्ह्यापासून गावाचे अंतर ८० कि.मी आहे.सदर गावं खानापूर तालुक्यामध्ये समाविष्ट केले नंतर संपूर्ण प्रशासकीय काम विटा येथून होत होते. प्रशासकीय दृष्ट्या काम करणेचे सोयीचे होण्यासाठी कडेगाव तालुक्याची निर्मिती करण्यात आली व शिरसगावचा समावेश कडेगाव तालुक्यात करण्यात आला शिरसगावचे तालुक्यापासून अंतर १९ कि.मी आहे.

                   गावाजवळ हिरव्यागार निसर्गगार निसर्ग नटलेले चौरंगीनाथ डोंगराचा परिसर मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.गावातील अमृतेश्वर देवालयाचे अतिशय प्राचीन व सुंदर मंदिर असून त्यांचा क वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाला आहे.गावची यात्रा एप्रिल महिन्यात भरवली जाते.त्यावेळी गावातील परगावचे व परिसरातील लोक मोठ्या प्रमाणावर उत्साहाने यात्रेत सहभागी होतात तसेच गावात रामजी बुवा मंदिर,विठ्ठल रिक्मिनी मंदिर,लक्ष्मी मंदिर,दत्त मंदिर, मशिद,बिरोबा मंदिर अशी विविध धार्मिक स्थळे आहेत. गावाचे विशिष्ट म्हणजे गावात लोकवर्गणीतून ४५ लाख किमतीचे हनुमान मंदिर बांधले आहे.

                   शिरसगावात अनु.जाती – जमाती व नवबौद्ध वस्तीत आण्णा भाऊ साठे समाजमंदिर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर आहेत.गावातील काही लोक शासकीय सेवा.शिक्षक ,कारखाने ,सैन्यात व इतर खाजगी व्यवसायात नोकरीत असल्यामुळे परगावी असताना गावात उस , सोयाबीन ,ज्वारी.भुईमूग ,मका व भाजीपाला हि पिके घेतली जातात.गावाशेजारी डोंगर परिसर असल्याने मोठ्या प्रमाणावर पशुपालन व्यवसाय पूर्वीपासून मोठ्या प्रमाणावर केला जातो गावातील बरीच शेती जिराईत असून ताकारी जलसिंचन योजनेतर अवलंबून आहे.गावात सर्वच जाती धर्माचे लोक एकत्रितरित्या आनंदाने राहतात .


गावाविषयी माहिती

गावाचे नाव :- शिरसगाव
ग्रामपंचायतीचे नाव :- शिरसगाव ग्रामपंचायत
स्थापना :- 1975
एकूण सदस्य :-20
लोकसंख्या :- 10000
पुरुष :- 5000
स्त्रिया :- 5000

आणखी पहा