गावातील उपक्रम व विकास कामे

                शिरसगाव ग्रामपंचायतीचा २००८ साली निर्मलग्राम पुरस्कार म.गांधी तंटामुक्त पुरस्कार ,पर्यावरण संतुलित समृद्ध गरम पुरस्कार , हागणदारीमुक्त गाव पुरस्कार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतातालुकास्तरीय पुरस्कार असे विविध पुरस्कार बक्षीस प्राप्त झालेली आहेत ग्रामपंचायततीमार्फत दरवर्षी १५ % मागासवर्गीय लोकांसाठी खर्च १०% महिला व बालकल्याण खर्च व ३% अपंगकल्याण खर्च १००% केला जातो . तसेच शासनाच्या घरकुल योजना म . न . रे . गा योजना , विशेष घटक योजना व इतर सर्व शासनाच्या योजनाचा लाभ ग्रामस्थांना दरवर्षी दिला जातो .

                शिरसगावची सन २०१७ / २०१८ वर्षासाठी जलयुक्त शिवार अभियानात गावची निवड करणेत आली आहे.गावातील सरपंच ,युवक व ग्रामस्थाच्या सहकार्याने लोकसहभागातून डोंगर खोरे परिसरात सी.सी.टी व दगडी बंधारे अंदाजे २ लाखाची कामे आहेत.तसेच या कामासाठी तालुक्याचे आमदार मा.डॉपतंगराव कदम साहेबसो यांनी फाउंडेशनमार्फत १.५ लाख सदर योजेनेत केलेल्या चांगल्या कामाची दाखल घेवून विविध अधिअक्रि पदाधिकारी व माध्यमांनी भेटी देवून कामाचे कौतुक केले आहे .

                शिरसगाव हे डोंगरी भागामध्ये येते असल्याने डोंगरी विकास कार्यक्रमातून व विविध शासनाच्या योजनेतून गावात रस्ते ,गटर,समाजमंदिर व इतर सर्व सुविधा झालेल्या आहेत.

अभियान व योजना

जलयुक्त शिवार अभियान

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शिरसगाव डोंगर-खोरे परिसरात लोकसहभागातून डोंगर-खोरे परिसरात समतल चरी दगडी बंधारे यांचे अंदाजे ३ लाख रक्कमेचे काम झाले आहे तसेच सन २०१७/२०१८ विकास आराखड्यास जलसंधारणाची विविध विभागामार्फत कामे करण्यात आली आहेत.सदर कामास मंजुरी मिळाल्यानंतर कामे चालू करण्यात येतील.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

गावातील नोंदणीकृत एकूण कुटुंब संख्या :- ४५८
अनु.जाती कुटुंब संख्या :-१११
अनु.जमाती कुटुंब संख्या :-०००
इतर कुटुंब संख्या :-३४७

संपूर्ण स्वच्छता अभियान

एकूण कुटुंब :- ३४५
शौचालय सुविधा असलेली कुटुंब संख्या :- ३४५
शौचालय सुविधा नसलेल्या कुटुंब संख्या :- ०
टक्केवारी :- १०० %

नळ पाणीपुरवठा योजना

ग्रा.पं मालकीची न.पा.पु.योजना
सार्वजनिक विहिरी :- ३
बोअरवेल:- १
नळ कनेक्शन संख्या :- २७८
सार्वजनिक पिण्याच्या टाक्या :-३


गावाविषयी माहिती

गावाचे नाव :- शिरसगाव
ग्रामपंचायतीचे नाव :- शिरसगाव ग्रामपंचायत
स्थापना :- 1975
एकूण सदस्य :-20
लोकसंख्या :- 10000
पुरुष :- 5000
स्त्रिया :- 5000

आणखी पहा