ग्रामपंचायत विषयी

ग्रामपंचायत – शिरसगाव
     
शिरसगाव ग्रामपंचायतीची स्थापना १९५५ साली झाली आहे.ग्रामपंचायत कार्यालय अतिशय सुंदर दुमजली
इमारत आहे.ग्रामपंचायतीचे कामकाज संगणक प्रणाली वापर केला जात असून संग्राम कक्षामार्फत विविध सोयी सुविधा दिल्या जातात सध्या,
    
श्री.संभाजी मांडके हे होतकरू व उच्चशिक्षित तरून सरपंच म्हणून कार्यरत आहेत. ग्रामसेवक म्हणून श्री.डी.व्ही.पाटील प्रशासकीय कामकाज पाहत आहेत .
तुम्हाला हे माहित आहे का ?
ग्रामपंचायत – शिरसगाव
सांगली व सातारा जिल्याच्या सरहद्दीवर शिरसगाव हे सोनहिऱ्याच्या कुशीत वसलेले व निसर्गाचे वरदान लाभलेले डोंगराळ व दुर्गम भागामध्ये वसलेले गावं आहे.१९ व्या शतकामध्ये शिरसगाव हे औध संस्थान अंतर्गत येते होते.स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाले नंतर शिरसगाव हे दक्षिण सातारा जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले.
गावचे एकूण भौगोलिक क्षेत्र एकूण क्षेत्रफळ :- १३००.३९ हेक्टर त्यामध्ये गावठाण क्षेत्र :- १२.५९ हेक्टर तसेच पडीक :- हेक्टर एवढे असून शेतीखाली एकूण क्षेत्र लागवडीखालील क्षेत्र :- ५६९.२५ हेक्टर बागायत क्षेत्र :-२४३.८७ हेक्टर एवढे आहे. गायरान क्षेत्र :- १५.३६ हेक्टर , जिरायत क्षेत्र :-४५९.२५ हेक्टर, महसुली क्षेत्र :-५७४ हेक्टर क्षेत्र एवढे आहे.गावातून ४-५ ओढे आहेत.
गावातील बहुतेक नागरिकांचा व्यवसाय शेती व शेती आधारित आहे. गावतील शेतीत मुख्यपिके ऊस,सोयाबीन,शेंगा हरबरा ए.पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.